Thursday, October 4, 2012

प्रेम ही फार वाईट चीज आहे...........
प्रेम ही फार वाईट चीज आहे..
फार थोड्या बाबतीत ती ताकत देते..
दुबळ बनवणं हाच प्रेमाचा स्थायी भावकोणताही बदल सेकंदात होत नाही..
ज्वालामुखीचा जेव्हा स्पोट होतो,
तो त्याच क्षणी जन्माला आलेला नसतो..
खोलवर त्याची तयारी वर्षानुवर्ष चाललेली असते..
तेंव्हा सगळे झोपतात,
जेवतात,हसतात,बागडतात,
प्रत्येक माणूस असाच धुसमुसत असतो..
केव्हातरी,
नाजूक,निसटत्या ,बेसावध क्षणी....
””प्रेमही तसचं,
ज्वालामुखीसारखं,धुसमुसत राहणार,उफाळलं कि सगळ्यांना जाळणारं,
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिलाही जळणारं...

- .पु.काळे

No comments:

Post a Comment