Thursday, September 25, 2014


असेच असू दे प्रेम आमचे ........

ती आहेच अशी की मोहात कुणीही पडावे
कधी इतक्या जवळ असते माझ्या की
दोघांत काहीच अंतर नसतं
अन कधी इतक्या दूर असते की
डोळ्यांना  दूरवर तिचे चित्रही नसतं ..............

तिला माझे प्रेम कसे कळलं
हे एक गुपितच आहे
जेव्हा ओठांजवळ  ओठ येतात
श्वासही फुलू लागतो
मग .....
मिठीत येताच  दोघांसही   कळतं....खरंच आता एकमेकांची गरजच आहे ....

ती म्हणते मला खूप खूप आवडतोस तू
मी म्हणतो तू माझा श्वास आहेस
तुझ्याशिवाय माझे आयुष्य जसे अंधारलेले विश्वच आहे .....

खूप प्रेम आहे दोघांचे हे दोघेही जाणतात
म्हणूनच तर  थोडे भांडण तर कधी
आसवे आणुनी  सतत जवळ येण्याची कारणेच  शोधतात ..............

असेच असू दे प्रेम आमचे ...............

किंमत दोघांच्या मनाची होती
न होते गर्व  सौंदर्याचे कधी
म्हणूनच तर हे नाते  खूप पवित्र वाटत होते ........

शपथ  घेत होते रोजच
स्वप्नही दोघांनी पाहिली
थोडे थोडे करून झोपड्याला ही ते  महलाचे रूप देत होते ...............
असेच असू दे प्रेम आमचे ........

असेच जगत होते दोघेही  मिठीत एकमेकांच्या मग
मृत्यूही सोबतच  येउ दे
दोघांनी  निरोप घेतला जरी सोबत
मग दुनियानेही आपल्या प्रेमास पाहून रडू दे ..................

असेच घडू दे  प्रेम करणा~यांचे
इतिहासाने   ही मग  प्रेमाला शब्दरूपी उतरवू दे .............
असेच असू दे प्रेम आमचे
आज सा~यां जगाला   पाहू दे .............

माझी "ती" अशी असावी

माझी "ती" अशी असावी,
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी "ती" अशी असावी...

प्रानजळ असावी, अवखळ असावी,
परी ती अगदी सोज्वळ असावी,
सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझी "ती" अशी असावी...

फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,
मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझी "ती" अशी असावी...

आपली माणसं, आपलं घर,
आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझी "ती" अशी असावी...

चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,
आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी,
माझी "ती" अशी असावी...

माया, प्रेम आपुलकी,
हे सर्व देणारी असावी,
माझी "ती" अशी असावी... माझी "ती" अशी असावी...!!

ती बोलत तर नाही
तीचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो
पाय आपोआप तीच्याकडे वळतात.
सतत कसला तरी
वीचार करत असते,
काय माहीत तीच्या
मनात काय चालते.
हासतानाही ती खुप
कमी हासु पाहते,
पण हासताना तीच्या
गालावर खळी पडते.
ती उभी असते तीथेच
कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी
सहवास तीचा मला जाणवतो.
खरच भीती वाटते
मला तीच्या जाण्याची,
माझ्या कवीतेत पुन्हा
काळोख येण्याची.
ती आली होती प्रकाश
बनुन माझ्या जीवनात,
आता जाणवतो सहवास
तीचा ह्रदयाच्य स्पंदनात.
आता वाटते मला तीनेही
माझ्यावर प्रेम करावे,
फक्त तीच्यासाठी असलेलं
माझे प्रेम एकतर्फी नसावे...

"बायको"

तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...

एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...

किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....

सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना...?

सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...

चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....

सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून...?

घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...

घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...

म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...

की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
केव्हाच गेली असती पळून....
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून...?"

राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...

थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून....

सगळं भांडण विसरून जेंव्हा,
घराशी ती एकरूप होते...
घर तिचंच होऊन जातं,
जेंव्हा ती कुशीत घेते.....

आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....

ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत....?

कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.....?
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!!"

क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....


केवळ बायकोला समर्पित....