Friday, September 7, 2012



वो नजर कहा से लाऊ जो तुम्हे भुला दे...
वो दुवा कहा से लाऊ जो इस दर्द्को मिता दे....
मिलना तो लिखा होता ही तक्दिरोमे  पर....
वो तकदीर कहासे लाऊ जो हम दोनोंको मिला दे......??????



(मी केलेली पहिली कविता )

मला क्षितिजाच्या पलीकडे जायचंय........
पण तुझ्यासोबत......
मला आकाशात उंच उंच उडायचंय.....
पण तुझ्यासोबत......
मला पावसात चिंब चिंब भिजायचंय...
पण तुझ्यासोबत......
मला गुलाबी थंडीत न्हायचंय
पण तुझ्यासोबत......
मला इंद्रधनुष्याचे रंग जवळून पाहायचेत
पण तुझ्यासोबत......
मला स्वर्ग कसा आहे हे बघायचंय
पण तुझ्यासोबत......
मला आपलं आयुष्य स्वर्गाहून सुंदर बनवायचंय
फक्त आणि फक्त तुझ्याचसोबत.....



~••••●●♥════════◄ रोहिणी ►════════♥●●••••~

`´¸.•°*”˜˜”*°•.
..¸.•°*”˜˜”*°•.
¸.•°*”"*°•.

Thursday, September 6, 2012





तुझ्याशिवाय मला नाही वाटत आता पुन्हा अस काही घडेल,
घायाळ मन माझ पुन्हा प्रेमाची पाऊल वाट धरेल,
जाता जाता तो अस सहज बोलून गेला,
विसरून जा मला आता,
हो... संपले... सर्व काही...
मी मात्र प्रेमात त्याच्या फार वेडी झाले होते,
स्वप्नात त्याच्या रंगून माझी दुनिया विसरून गेले होते,
आता वाटा माझ्या संपतात पण सोबत तुझी नसते,
माझी मीच चालते पण, संगत सावली तुझी नसते,
आता आठवणी शिवाय ओंजळीत माझ्या उरत काही नाही,
आणि मागे वळून पाहायला, तुझी गोड हाक नाही,
तरी ठरवले मनाशी, हे जीवन तुझ्या शिवाय जगायच,
पण चुकूनही आता प्रेमाच्या वाटेला नाही जायच...!!!♥♥♥


~••••●●♥════════◄ रोहिणी ►════════♥●●••••~
`
´¸.•°*”˜˜”*°•.
..
¸.•°*”˜˜”*°•.
¸.•°*”"*°•.



माझ्यावर फक्त तू नाराज होवू नकोस रे .....
रुसून बस माझ्यासाठी पण
फक्त तू नाराज होवू नकोस रे......
कितीही रडव मला.,माझ्याशी कितीही भांड
पण तू नाराज नको होवूस रे....
जेंव्हा कधी असं होईल...
माझी आठवण तुला घडी घडी येईल...
माझी साथ तुला सतावत राहील...
माझा स्पर्श तुला हवाहवासा वाटेल...
काळजी करू नकोस...
स्वप्नान मध्ये मीच येईल तुझ्या...
देईन माझ अस्तित्व दाखवूनतुला...
घेईन तुझा हात माझ्या हाती...
पण फक्त तू नाराज होवू नकोस रे...
रुसून बसेल कारण नसताना मग मीही तुझ्यासाठी...
रडलास तर माझे हात असतील...
त्या आसवांना पुसण्यासाठी...
नाही मी सत्यात तुझ्यासोबत....
पण आहे तुझ्याच स्वप्नात तुझ्यासाठी...
पण फक्त तू नाराज होवू नकोस रे
...