Thursday, April 11, 2013


काही अनोळखी माणसं आयुष्यात येतात तरी कशाला...
ओळखीचे होऊन जीवाचे नाते बनवतात तरी कशाला...
बेरंग उदासलेल्या आयुष्यात रंग भरतात तरी कशाला...
हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा वाट दाखवतात तरी कशाला....
चार पाऊले सोबत चालून पुन्हा सोडून जातात तरी कशाला...
क्षणभर आनंद देवून कायमचे दु:खी करून जातात तरी कशाला...
ओळखीचं हे नात क्षणात अनोळखी वाटत तरी कशाला......
काही अनोळखी माणसं आयुष्यात येतात तरी कशाला...

~Rohini



Saturday, February 16, 2013



रडू तर येत होत ...
डोळ्यात मात्र दिसत नव्हत ...
चेहरा कोरडा होता....
पण मन मात्र भिजत होत ....
कारण डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात.....
पण मन जाणणारे कमीच असतात......

Friday, February 15, 2013


"माझं पहिल पहिल प्रेम"
एकदा तरी प्रेम करून बघ...
सगळ काही पाहिल असशीलच मग
एकदा प्रेम करून बघ..

एकटच काय जगायच..?
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..

खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..

कविता नुसत्याच नाही सुचणार...
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..

खुप छान वाटत रे..
सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ...

नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..

नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..

एक जखम स्वतः करून बघ..
स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..

नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..

विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..

रिकाम काय चालायच..?
आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..

रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..

सोपं नसत रे...एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..

सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ.........

हुंदके मनाचे तुला का,
ऐकू येत नाही .....

अश्रूं डोळ्यातले तुला का,
दिसत नाही .....

रोज रोज आठवते सुंदर,
सहवास तुझा .....

आता आठवणींचे ते दिवस,
पुन्हा का येत नाही .....

तुझ्याशिवाय खरं तर,
मला करमतचं नाही .....

कारण ?????
तुझी आठवण आल्याशिवाय,
मी श्वास घेत नाही ....

Saturday, January 26, 2013


ऋण....
ऋण फिटे जन्मदेचे....जन्म दिलेल्या मातेचे ऋण,पालन-पोषण केलेल्या पित्याचे ऋण, चार चौघात मान वर करून ज्यांच्यामुळे बोलू शकतो तसेच ज्यांनी अज्ञानापासून ज्ञानाकडे , अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवला  अशा गुरूंचे ऋण. काही केल्या आपण फेडू शकत नाही हेच खरे.
याहून एक वेगळेच ऋण असते जे मला आज समजले.... ते म्हणजे समाज ऋण .....
समाज हा आपल्यासारख्या लोकांनीच बनलेला असतो.आपण या समाजाचे अविभाज्य घटक आहोत.
ज्या समाजात आपण वावरतो, ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना खरच खूप आनंद होतोय.
स्वतःवरची नजर हटली कि इतरांमधले सौदर्य दिसू लागते.माणूस कधी कधी स्वतःच्याच दु:खात इतका हरवून जातो कि आपल्या आजूबाजूला आपल्यापेक्षाही कितीतरी पटीने दु:खी लोक असतात हे विसरूनच जातो.दुसर्याचे अश्रू पुसून स्वता:चे दु:ख विसरण्याचा एक मार्ग आहे असे म्हटले तरी चालेल.
मी हिंदू धर्मातली आहे याचा मला सार्थ अभिमान तर आहेच.पण याच बरोबर मी अशा आई-वडिलांची मुलगी आहे. ज्यांना मी देवाच्याही आधी मानते.देव कुणी पाहिलाय असे आपण म्हणतो पण खरे तर रोजच त्याचे दर्शन होते आई-वडिलांच्या रुपात.आपल्या लेकरांच्या हजारो चुका पोटात घालून हसत माफ करते ती विशाल अंत:करणाची आई. आणि नारळासारखे वरून कठीण कवच आणि आत मात्र पांढरेशुभ्र मन असणारे वडील.
पर्वता सारखे वडील तर नदी सारखी आई ,
त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही.
लहानपणापासून दुसर्याचा विचार करायला लावणारे संस्कार त्यांनी दिले, प्रत्तेकाला वेगळा खाऊ आणता एकत्र एका ताटात खाण्याचा आनंद त्यांनी दाखविलाहे सगळे त्यांनी शब्दात नाही तर त्यांच्या कृतीतून आम्ही आचरण केले. घरी मागायला येणाऱ्या मागताकर्याना कधी रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. आपण जेवत असलो तर आपल्यातली अर्धी भाकरी त्यांना द्यावी...हे सगळे संस्कार..
वाढदिवसाच्या  दिवशी केक कापून पार्ट्या करता औक्षण करून भरभरून आशीर्वाद देणारी माझी आई. तिने आज मला माझ्या वाढ-दिवसाच्या दिवशी भगवद्गीता द्यावी हे खरच खूप अनपेक्षित होते माझ्यासाठी. कारण दर-वर्षी मित्र-मैत्रिणींसोबत मी माझा वाढ-दिवस साजरा करायचे. नेहमी वाटायचे कि मला एखादे पुस्तक द्यावे  कुणीतरी गिफ्ट म्हणून. पण सगळ्या मैत्रिणी काही तरी शोभेची वस्तू वगरे द्यायच्या ज्याचे मला फारसे आकर्षण नाही. पण आईच्या या गिफ्ट ने  मला खूप आनंद झाला.
हे सगळे शिकत असताना.. जेव्हापासून समजतंय तेव्हापासून  नेहमी असे वाटायचे कि समाजात किती गरीब परिस्थिती आहे,मला यांच्यासाठी काही करता येईल का? अगदी लहानपणापासून कुठे अपंगत्व,गरिबी, लाचारी पहिली कि मन अस्वस्थ व्हायचे,का कुणास ठाऊक मन उदास व्हायचे.मी सायकल चालवायचे तेव्हा आई म्हणायची अगं चालणार्यांकडे बघ,पण माझे लक्ष पाय नसणार्यांकडे  जायचे.त्यामुळे कधी श्रीमंती,पैसा अशा गोष्टीचे आकर्षण,हव्यास वाटलाच नाही.
या वेळी परत nov दिवस उजाडला,अगदी नकोसा वाटतो हा दिवस, असे वाटते ३६५ दिवसांमध्ये हा दिवसच येऊ नये. पण आला..या वर्षी मन खूप उदास होते.अश्रूंच्या सागरात बुडून गेले होते.भैयाने cadbury  celebration  दिले उठल्या उठल्या..अश्रुंचे हुंदके आवरले,आई-वडिलांचे दर्शन घेऊन कॉलेजमध्ये गेले..माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी, मैत्रिणीनी मनापासून wish  केले, टेबलापुढे खूप सारी चोकलेट आली, आम्ही सर्वांनी मिळून खाल्ली. तेवढ्यात एका मुलीने प्रश्न केला,"madam तुम्ही तुमचा वाढ-दिवस कसा साजरा करणार आहेत?" ह्या प्रश्नाने मनात असे घर केले कि मी नेहमी म्हणते कि मला कुणासाठी तरी काही करायचे आहे... पण नुसते म्हणून चालेल का? कृती कधी करणार? सुविचार सांगायला कुणालाही येतात पण आचरणात कधी आणायचे? ताबडतोब एक निर्णय घेतला कि आपण एखाद्या आश्रम शाळेत किवा अनाथ आश्रमात वाढ-दिवस  साजरा करूया,ज्यामुळे तिथल्या चिमुरड्या पिलांसाठी काहीतरी करता येईल. आणि हि  केलेली कल्पना खरच साकारली.

आई-बाबांच्या जीवावर करताना थोडा कमीपणा वाटला असता, पण आता मी कमवायला लागले होते, आपल्या तुटपुंज्या पगारीत्ला खारीचा वाटा त्या निष्पाप जीवासाठी खर्च करावा असे वाटले आणि आम्ही त्यांच्यासाठी खाऊ आणला, चोकलेट आणले, पेनही आणले. तिथे गेल्यावर त्या सगळ्या मुलांना खूप आनंद झाला. ते कुतूहलाने बघत होते आमच्याकडे.मी,आई-बाबा,आणि माझ्या दोन मैत्रिणी आम्ही सर्वजण गेलो. सर्वांसाठी हा नवीन अनुभव होता.
लहान मुलांना केक फार आवडत असतो.तिथल्याच एका सर्वात छोट्या मुलाला बोलावले आणि त्याच्याकडून केक कापला. सगळे "HAPPY  BIRTHDAY  TO  YOU" म्हणत होते.आतून मन एकसारखे भरून येत होते.
त्यानंतर खाऊ वाटप  झाले, पेन दिले. सगळी मुले इतकी खुश झाली जणू काही ते माझे खूप जवळचे कुणीतरी आहेत असे अवघ्या अर्ध्या तासात नाते निर्माण झाले. तिथे बसलेल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले "HAPPY  BIRTHDAY  TO  YOU रोहिणी ताईअजूनही आवाज घुमतोय त्यांचा.
त्यातच दुग्ध-शर्करा योग म्हणजे आश्रम शाळेचे मालक म्हणजे माझे शिक्षक, त्याना मला पाहून इतका आनंद झाला होता तो त्यांनी शब्दात व्यक्त केला.यानंतर आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना म्हणालो..
इतनी शक्ति हमें दे दाता
मनका विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रास्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना............
या अर्थपूर्ण आणि आर्त भावनेच्या प्रार्थने नंतर आईने मला भगवद्गीता दिली अर्थासह त्यामुळे तर हा आनंद द्विगुणीत झाला.आणि आभार मानून हा कार्यक्रम संपला आणि अखेर त्या चिमुरड्यांचा निरोप घेण्याची वेळ आली.
सगळी मुले "Bye  रोहिणी ताई " म्हणू लागली, एवढ्या कमी वेळात त्यान्ह्च्याशी लळा लागला होता, जाताना वाईट तर वाटतच होते पण मनात एक वेगळाच आनंद होता, सुख होते कि या जगात खूप अंधार आहे, तो घालवण्यासाठी फार काही नाही पण एक छोटीशी पणती पेटवली.

Saturday, January 19, 2013





काही नको मला फक्त तुझी साथहवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी..
सोडून जाऊ नकोस कधी मला
हीच एक तुझ्या कडून अपेक्षाहवी..
जरी मी कधी सोडून गेले तुला
तर ते सहन करण्याची तुझी तयारी हवी..
कधी सुखात तर कधी दुखात
तुझ्या आधाराची फक्त मला गरज हवी.

Tuesday, January 8, 2013




रंग माझा ओळखावा ......”

“Beauty is not about having a pretty face .It is about having a pretty mind,
a pretty heart & most importantly a pretty soul.”

चुकीच्या व्यक्तीसाठी केलेल्या....
त्याच्या सावळ्या वर्णा मुळे तिने त्याला नापसंद केलं..
तरी चोकलेट डे ला त्याने तिला सुंदर कव्हरच चोकलेट दिलं..
तिने जेव्हां उघडून पाहिलं तर ते रिकामच निघालं,,,
मग तिने फोन करून त्याला विचारलं कां रे मला फसवलं..??
.
.
.
तो म्हणाला वरच्या रंगला भुलून,
ज्याने जीवनाचा साथीदार ठरवला
त्याने आत मध्ये काय आहे,
हे पाहायचं तरी कशाला...!!!


थोडक्यात  काय.... “मला माझा सावळा रंग आवडतो. चेहऱ्याचा रंग बदलून माणसं बदलतात यावर
माझा विश्वास नाही. त्वचेच्या रंगावरून माणसं जोखणाऱ्यांच्या यादीत मला माझं नाव नकोय….
गोरा रंग असणे म्हणजेच सौंदर्य ही आजची परिभाषा बनली अहे. त्यामुळे लग्नासाठी मुलगी ही उंच,
गोरीच हवी. वर्षानुवर्षे लग्नाच्या बाजारात ही मागणी आहे. सावळ्या मुली कर्तृृत्ववान असल्या तरी
रंगामुळे नाकारल्या जातात. काळ्यासावळ्या मुली जन्मापासूनचमार खाल्लेल्याअसतात.
त्या कर्तृत्ववान असल्या तरी रंगामुळे मार खातात. त्यांचा आत्मविश्वास हरवतो.
युरोपियनांच्या दृष्टीने भारतीय काळेच आहेत. काळ्या रंगाच्या द्वेषापोटी युरोपीय निग्रोंचा
द्वेष करतात. इथला दलित आणि तिथला निग्रो हे वंशवादाचे आणि वंशविद्वेषाचे बळी ठरले आहेत.
काळा रंग, अशुभ मानला जातो. पण उभ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या  विठू माऊलीचा, राम-कृष्णाचा रंगही
काळा आहे, गडद काळा आहे. मग आपण आपल्या  दैवतांच्या रंगालाचअशुभमानणार का?
शंकराच्या पिंडीवर पांढरे फूल वाहिले जाते. पण पिंडीचा रंगही काळाच आहे. सृष्टीच्या सृजनाचे
प्रतीक असलेल्या शिवलिंगाचाही रंग काळा आहे.

"पाहती सारे जरी वाईट दृष्टीने मला!
मी कसा आहे; विचारा पंढरीच्या विठ्ठलाला!
मीच शरयूच्या जळी अन्मीच कालिंदीतही…..
रामही अन्कृष्णही माझ्यात मी सामावला!!!"

काही लोक जेव्हा सावळ्या रंगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात,तेव्हा त्या मुलीला काय वाटत असेल ???
किती न्यूनगंड  निर्माण होत असेल ,, याची कल्पना तिलाच समजू शकते. पण काही लोक असे आहेत
कि सावल्या रंगापेक्षा अंतरंगाला ते जास्त महत्व देतात.आणि तेच जास्त महत्चाच असत...
म्हणतात ना...

"अगर आप किसीको अच्छे लगे...
तो अच्छे आप नाही वो होते ही,,,
क्योंकी अच्छाई  देखनेकी नजर ...
उनके पास होती है……"
सोचको बदलो... नजारे बदल जायेंगे......

हा माझा पहिला लेख आहे... माझा अनुभव म्हटले तरी चालेल.... पण कधी कधी असे वाटते.... 
माझा रंग माझ्यासाठी शाप आहे का??? पण मी असा विचार कधीच करणार नाही.... माझ्या आईने
मला सांगितले आहे... कि माझ्यासारखे या जगात कुणीच नाही... अगदी प्रत्तेकाच्या हाताच्या
बोटांची चक्र पण वेगळे आहेत.... बनवणार्याने आपल्याला कसे बनवले असेल????
आपण पण त्याचाच अंश आहोत....
मग तो जर इतका सुंदर असेल तर आपण हि सुंदरच आहोत....
गरज आहे ती फक्त नजर बदलण्याची...दृष्टीकोन बदलण्याची.....
क्षितिजाकडे  पाहण्याच्या दृष्टीची..........
माझा लेख जे लोक वाचतील त्यांना फक्त एकच विनंती आहे....."रंग माझा ओळखावा............"

                                                                                                                 
                                                                                                                                                                           ~  रोहिणी