एकच क्षण हवाय
रे मला...
तुझ्यासोबत बोलायला....
भाव माझ्या मनातले सांगायला...
अन तुझ्या मनातले ऐकायला....
एकच क्षण हवाय
रे मला...
तुझ्या सोबत जगायला.....
सुख तुला द्यायचंय
मला......
दुख ऐकून घ्यायचंय
मला....
एकच क्षण हवाय रे मला...
तुझ्यासोबत चांदण्यात फिरायला....
आकाशात झेप घ्यायला
अन क्षितीज्यापलीकडे जायला.....
एकच क्षण हवाय रे मला....
तुझ्यासमोर बसायला
डोळे भरून पाहायचय तुला....
हृदयात माझ्या साठवून ठेवीन तुला......
एकच क्षण हवाय रे मला...
तुझ्याबरोबर चालायला....
पुढील आयुष्याच्या शुभेच्या द्यायला....
अन् अखेरचा निरोप घ्यायला................................................................~$onu !!!

No comments:
Post a Comment