तुझ्याशिवाय.....
सगळ काही अपूर्ण आहे......
अगदी रोज ठरवते.......आज मी कविता लिहिणार...तुझ्याशिवाय.....
माझ्या कवितांना शब्दही सापडत नाहीत.....तुझ्याशिवाय.....
माझ्या कविता कविताच उरत नाहीत.....तुझ्याशिवाय.....
माझ नावही पूर्ण होत नाही तुझ्याशिवाय......
माझ्या चित्रात रंग कोण भरणार ??? तुझ्याशिवाय.....
माझीच मी राहत नाही.... तुझ्याशिवाय..........
आकाशात चांदण दिसत नाही....तुझ्याशिवाय..........
पावसाकडे बघायचीही इच्छा होत नाही.....तुझ्याशिवाय..........
खूप एकटी आहे रे मी......तुझ्याशिवाय..........
माझ्या आयुष्याला अर्थ राहत नाही....तुझ्याशिवाय.......
सगळ काही अपूर्ण आहे................................तुझ्याशिवाय....................................सोनू

No comments:
Post a Comment