Tuesday, September 18, 2012



तुझ्यापासून दूर जाताना....

अश्रुना कोंडून ठेवते मी डोळ्यात...
भावनांना साठवून ठेवते मी हृदयात ....
तुला मी रडलेले आवडत नाही ना.....
पण अश्रूंचा बांध फुटतो कधी कधी....
माझे मन आक्रोश करीत असते...
फक्त तुझ्याच साठी........
तुला दिलेला शब्द मी मोडणार नाही.....
हृदय माझे रडत असले तरी....
डोळ्यात पाणी कधी आणणार नाही.......
डोळे माझे दिसत असतील तुला शांत....
पण हृदय असते नेहमीच अशांत.........
कैद केले आहे आज अश्रुना तुझ्यासाठी......
हरणार आहे परत आज तुला जिंकवण्यासाठी ...........:)
~सोनू

No comments:

Post a Comment