डोळे .. खूप काही सांगून जातात....
तू परत यावास या आशेने
क्षितिजाकडे पाहत असतात....
तुझ्या गोड आवाजाने
आनंदाने फुलतात...
तुझ्या बोलक्या श्वासाने
लाजेने ते मिटतात
तुझ्या शांत बसण्याने
रागाने ते बोलतात
तुझ्या आठवणीने
ते रोजच पाणावतात........
डोळे .. खूप काही सांगून जातात.... :( ~सोनू...
No comments:
Post a Comment