ए कसा आहेस रे तू???
माझ्या प्रीतीतल्या पाखरासारखा आहेस???
का माझ्या
स्वप्नातल्या राजकुमारासारखा आहेस तू???
ए कसा आहेस रे तू???
माझ्या कल्पनेतल्या कवीसारखा आहेस???
का माझ्या नाटकातल्या
नायकसारखा आहेस तू???
ए कसा आहेस रे तू???
रिमझिम पावसातल्या सरीन्सारखा आहेस???
का गुलाबी थंडीतल्या
गार लाटांसारखा आहेस तू???
ए कसा आहेस रे तू???
माझ्या कवितेतल्या शब्दांसारखा आहेस???
का माझ्या शब्दांच्या
कवितेसारखा आहेस तू???
~सोनू
~सोनू

No comments:
Post a Comment