Tuesday, November 27, 2012


नाराज नाही मी तुझ्यावर
तु मला आठवत नाहीस म्हणुन...
नाराज नाही मी तुझ्यावर
तू प्रेम करत नाहीस म्हणुन...
नाराज आहे मी त्या देवावर
जो मेहेरबान नाही माझ्यावर...
नाराज आहे मी त्या नशीबावर
नाही तुझे नाव माझ्या आयुष्यावर...
तरी पण एक विश्वास आहे..
हात त्याच्यासमोर जोडते
आज ही फक्त तुलाच देवाकडे मागते...
तरी पण एक विश्वास आहे..
त्या नशीबाला मी आजमावते...
आज ही फक्त तुझीच वाट पाहते...
फक्त तुझीच वाट पाहते...

No comments:

Post a Comment