पहिलं प्रेम...
माझं पहिलं प्रेम...
तूच आहेस...माझं पहिलं प्रेम...
मला वाचनाचा बिलकुल छंद नवता... पण तुझ्यासाठी वाचलेलं आणि तूच वाचायला सांगितलेलं पाहिलं पुस्तक..."पहिलं प्रेम..."आठवतंय का तुला?????
त्या पुस्तकाचं नावच मला इतकं आवडलं होतं.... तू सांगितल्याबरोबर मी वाचनालय लावलं.... त्या पुस्तकासाठी........................का तुझ्यासाठी............ का कशासाठी????????? माहिती नाही.......
पण अगदी घाईघाईने वाचनालय लावलं आणि मनात खूप इच्छा होती... कि "पहिलं प्रेम..." हेच पुस्तक मिळावं....पण त्या काकांना मागायचं कसं??? ओळखीचे होते ना......मग त्यांनी माझ्याजवळ.... खूप रजिस्टर दिली ज्यामध्ये सर्व पुस्तकांची नावें होती.....पण.... माझ लक्ष फक्त एकाच पुस्तकाकडे होते..... १ म्हणजे.... "पहिलं प्रेम.." आणि दुसर "वपुर्झा" .... पण मनात एकच होत........... पहिलं प्रेम...कुठे आहे?????
का सापडत नाहीये?????? खूप खूप खूप शोधलं... अगदी अर्धा तास पानं चाळत होते मी.....
सगळी कथासंग्रह,नाट्यसंग्रह, सुंदर सुंदर कादंबर्या होत्या.....पान माझं लक्ष फक्त एकाच पुस्तकाच्या नावाकडे होत...."पहिलं प्रेम..."......अगदी शेवटपर्यंत शोधत होते.... काका माझ्याकडे पाहत होते.... त्यांना समजले होते....हि काहीतरी वेगळेच पुस्तक शोधत आहे.......पण ते काही बोलले नाही..... आणि मी मात्र वैतागून गेलेली..... सापडतच नवते.... इतके मोठे वाचनालय.... आणि मला जे पाहिजे तेच पुस्तक का नसेल यांच्याकडे......असे वाटून खूप शिव्या दिल्या मनात..... शेवटी मी तसेच कसे घरी निघून जायचे म्हणून त्यांना..."TO THE LAST BULLET" हे पुस्तक द्यायला सांगितले.....
पण जाता जाता मला राहवलेच नाही..... त्यांना म्हटले.... "काका "पहिलं प्रेम..." पुस्तक आहे का हो???.... आणि काय जादू झाली......काका म्हणाले......... आहे पण खूप फाटलेले आहे............ मी खूप
OVER EXCITED झाले...... आणि अगदी चाचपडत म्हणाले..."काका, द्या ना मला................. .मी चिटकवून आणते.....आणि काकांनी माझ्या हातात ते पुस्तक दिलं.... काय वाटल असेल त्या क्षणाला.... शब्दात सांगूच शकत नाही..... पण तुला समजले होते ना सगळे.......खूप आनंदात होते मी.....असं वाटलं मला स्वर्ग मिळाला कि काय......आणि माझ्या हातात होत एक अतिशय जीर्ण झालेलं पुस्तक.......पहिलं प्रेम...... इथूनच सुरु झाल तुझं माझं पहिलं प्रेम........
का सांगितलं होतंस मला वाचायला ????
तुझ्या प्रेमासाठी २ दिवसात वाचून काढलं....पण खरच समजलंच नाही मला...
तू म्हणालाच होतंस ना.... "तुला नाही समजणार सोनू....".........तुझं माझं पहिलं प्रेम.......
कुणालाच मिळत नाही का पहिलं प्रेम.......
माझ्या सुखासाठी माझ्यापासून इतका दूर गेलास.... वेड्या.. प्रेमाची परिभाषा माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे ना????
पाण्याशिवाय मासा राहू शकतो का??? तूच सांग....ते पुस्तक नाही अवडल मला.... प्रेयसी वेगळी आणि बायको वेगळी.... मुळात हि कल्पनाच चुकीची आहे.....पहिलं प्रेम सर्वांनाच मिळत नाही....का????????
पण मला हे खोट ठरवून दाखवायचंय ..... मला तुझ्यासोबतच संसार करायचा आहे............. तो पण
"माझा सोन्याचा संसार....राजा-राणीचा दरबार......." असा....मला परत मिळवायचं.... माझं पहिलं प्रेम.........
मला सर्वाना सांगायचंय तूच माझं पहिलं प्रेम.....आणि तूच शेवटचं........
कुणीतरी खूप वाट बघतंय रे तुझी.....घरट बांधायचंय रे तुझ्यासोबत........ज्याची प्रत्तेक काडी आपण जमवलेली असेल.....
तुझी सोनू.....

No comments:
Post a Comment