जे वेड मजला लागले , तुजलाही ते लागेल का ?
माझ्या मनीची हि व्यथा कोणी तुला सांगेल का ?
मी पाहते स्वप्नी तुला , मी पाहते जागेपणी
जे मी मुकेपणी बोलते शब्दात ते रंगेल का ?
हा खेळ घटकेचा तुझा , घायाळ मी पण जाहले
जे जागले माझ्या मनी , चित्ती तुझ्या जागेल का ?
माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज , रे
सर्वस्व मी तुझ वाहिले , तुजला कधी उमगेल का ?

No comments:
Post a Comment