Sunday, December 16, 2012


हे बंध रेशमाचे .....

किती नाजूक, हळवी असतात हि नाती... कुणीतरी हळूच आपल्या नकळत आपल्या आयुष्यात येत आणि आपल्या मनात शिरून आपलंच होऊन जात... कधी आपल्या मनावर राज्य करायला लागतं आपलं आपल्याला पण समजत नाही....  मग अशी नाती का तोडायची??? हि नाती कायम जपायची असतात......आणि मी जपणार आहे.. 

 "खरच असतात का आत्मिक संबंध ???? " असा प्रश्न मला आज पडला........ असतील का अशी नाती.... माझ्या मनाला मी जेव्हा हा प्रश्न केला तेव्हा आतून उत्तर आले कि.... हो....असतात.... आत्मिक संबंध असतात... मग ते नाते मैत्रीचे असेल.... प्रेमाचे असेल.... किवा प्रवासात भेटलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीचे असेल..... एकदा नाते निर्माण झाले कि ते निभवायचे,,, आजमवायचे का विसरायचे हे आपणच ठरवीत  असतो..... 


आपल्या जीवनात रोज कुणीतरी भेटत असत... कुणी हसवून जात तर कुणी रडवून जात...  कधी चांगली माणस भेटतात तर कधी वाईट...... 
चांगल्या लोकांकडून आशीर्वाद घ्यायचे असतात आणि  वाईटांकडून अनुभव... जे आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतील...... म्हणून हे बंध रेशमाचे जपायचे असतात....
"आपल्या आयुष्यातून एखादी प्रिय व्यक्ती निघून गेली म्हणून रडायचं नसतं तर त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण आठवून हसायचं असतं............"

                                                                 ~Rohini Shinde



No comments:

Post a Comment